Nisarg Prem Kavita
निसर्ग प्रेम कविता
रणरणत्या उन्हातुन चालताना,
आज एक वृक्ष धरणीत,
घट्ट मुळे रुजवुन,
सावलीसाठी उभा पाहीला,
त्याच क्षणी मनाचा,
रीता भाव जाणीला,
व्यर्थ का आसमानीच्या ढगाच्या,
सावलीची आस करायची,
आता नाही त्या चंचल ढगाच्या,
बंधनी बांधुन रहायचे,
ज्याच्या शोधात ठेच लागुन,
स्वतःच रक्तबंबाळ व्हायचे,
अन मग मनाने मनाशी,
निर्णय केला..
या धरेशी नाते असलेल्या,
वृक्षासवे भर उन्हात केवळ,
सावलीचे क्षण अनुभवायचे,
वृक्षास त्या बिलगुन,
वेलीसम जगायचे,
सावलीत त्याच्याच,
सुगंधाने बहरायचे.
आज एक वृक्ष धरणीत,
घट्ट मुळे रुजवुन,
सावलीसाठी उभा पाहीला,
त्याच क्षणी मनाचा,
रीता भाव जाणीला,
व्यर्थ का आसमानीच्या ढगाच्या,
सावलीची आस करायची,
आता नाही त्या चंचल ढगाच्या,
बंधनी बांधुन रहायचे,
ज्याच्या शोधात ठेच लागुन,
स्वतःच रक्तबंबाळ व्हायचे,
अन मग मनाने मनाशी,
निर्णय केला..
या धरेशी नाते असलेल्या,
वृक्षासवे भर उन्हात केवळ,
सावलीचे क्षण अनुभवायचे,
वृक्षास त्या बिलगुन,
वेलीसम जगायचे,
सावलीत त्याच्याच,
सुगंधाने बहरायचे.
ABOUT THE AUTHOR
A web designer from India. And then you write some more information about yourself like this to fill out the space that is left.
0 comments:
Post a Comment