Home
Archive for
2014
Naate
नातं...
![]() | ![]() या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं. अस नातं गुंफ़ता गुंफ़ता स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते नकळतं गुंफ़ले जात असते... कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना, नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी.... जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं.. रिकाम्या ओंजळीनेच मग जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे..... असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं... तरीही, या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं. ![]() | ![]() |
Bare Zale
बरं झालं तू नाहीस म्हणुन तुझी आठवण येते बरं झालं तू गेलीस ते दिवस जातो कसाबसा रातरी कोण र्ड्ल आसते बरं झालं तू गेलीस ते सार्या घटका गोठून गेल्या भिंतीवर घड़याळ कीट्कीट करते बरं झालं तू गेलीस ते का जगु हा प्रश्न आहे मरण्याचे पण भय संपले बरं झालं तू गेलीस ते |
Manatil Prateg Bhavna Shabtat Saagta Aali Tar....
![]() वाटणारी प्रत्येक गोष्ट शब्दांत मांडता आली तर... मनातली प्रत्येक भावना बोलुन दाखवता आली तर... तुझ्यावर प्रेम आहे, हे सहज सांगता आलं तर.. तुझ्याशिवाय जगुच शकत नाही, हे पटवुन देता आलं तर... तुझी खुप आठवण येते हे विसरुन जाता अलं तर... तुझ्या पलिकडे सुध्दा आहे हे जाणुन घेता आलं तर... माझं सुध्दा अस्तित्व आहे, हे समजुन घेता आलं तर... तु फक्त माझीच आहेस, हे तुला न सांगता कळलं तर.. तु अशिच जवळ रहा, हे स्पर्शानं सांगता आलं तर... तु जवळ नसतेस तेंव्हा, तुझा स्पर्श जाणता आला तर.. किती बरं होईल, जर मन वाचता अलं तर... ![]() किती बरं होईल, जर मन वाचता अलं तर... |
College Life
" कॉलेज लाइफ़ " कँटीन मधला चहा आणि चहा सोबत वडा पाव पैसे कुठ्ले खिशात तेव्हा उधारीचचं खातं राव !!! कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून आणि पोरींची चेष्टा करणं दिसलीच एखादी चांगली तर तिला लांबूनच बघून झुरणं !!! बसलोच चुकून लेक्चरला तर शेवटचा बाक ठरलेला कुणाच्या तरी वहीतलं पानं आणि पेन सुध्दा चोरलेला !!! परिक्षा जवळ आली कि मात्र रात्री जागायच्या डोळ्यात स्वप्नं उद्याची म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !!! पूर्ण व्हायचं एक वर्तुळ एक वर्ष सरायचं पुन्हा नव्या पाखरांसोबत जुनं झाड भरायचं ... अशी वर्तुळ भरता भरता कळलं अरे कागदच भरला !!! वर्तुळ झाल्या कागदाला फ़क्त सलाम करायचा उरला !!! पुन्हा नविन रस्ता पुन्हा नविन साथी जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या फ़क्त आठवणीच हाती !!! |
Tuzi Aathavan
![]() ![]() तू नाहीस तरी आठवणी... तुझी आहे अजूनही... फुल केव्हाच सुकून गेलय...परंतु गंध ओला आहे अजूनही... वादळ कधीच शांत झालाय...तरी वारा वाहतो अजूनही... वात बदलली मी तरी पाउल खुणा दिसतात...तुझ्या अजूनही... रानातून एकटे फिरताना...साथीला आवाज असतो तुझा अजूनही... रंग सारे संपले माझे तरी...अधुरे आहे चित्र अजूनही... दिलास तू आकार मजला...निर्विकार मी अजूनही... फोटो तुझा पाहूनही...काहूर मनी उठते अजूनही... तू परतणार नाहीस हे माहित असूनही...वाट तुझी पाहतो मी अजूनही... ![]() |
Subscribe to:
Posts
(
Atom
)







